
बातमी कट्टा:-सोशल मिडीयावर रिल बनविण्यासाठी बसस्थानकात मुलींसमोर हिरोगीरी करणाऱ्या तरुणाची पोलीसांनी नशा उतरवली आहे.हिरोगीरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मुलींसमोर त्याला कान धरुन माफी मागायला लावली आहे.
धुळे शहरातील देवपूर बस स्थानकात शिंदखेडा तालुक्यातील राज पवार आपल्या मित्रासोबत मोटरसायकलवर आला आणि ज्या ठिकाणी मुली बसची प्रतीक्षा करत होत्या, त्या ठिकाणी इन्स्टा रिल तयार करायला लागला.त्याचा हा टपोरीपणाचा विचित्र प्रकार पाहिल्यावर मुली तेथून उठून बाजूला झाल्या.त्याचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्य लोकांकडून व्यक्त झाली.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने तात्काळ राज चा शोध घेतला व त्याला त्याब्यात घेतले. त्यानंतर राजला बस स्थानकावर नेण्यात आले पोलिसांनी त्या ठिकाणी खाक्या दाखवल्या नंतर,कान पकडत उदबशा घालत त्याने विद्यार्थिनींची माफी मागितली.या तरुणाला चांगलीच अद्दल घडवलेल्याने टपोरीगिरी करणाऱ्यांनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.