ईट का जवाब पत्थर से ? कामराज निकामांनी साथ सोडल्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यात आमदार जयकुमार रावल काय बोलतील ? सर्वांचे लक्ष

बातमी कट्टा:-विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय नेते मंडळींनी कंबर कसली आहे.भेटीगाठींपासून तर सभेपर्यंत विविध कार्यक्रम सुरु आहेत.शिंदखेडा तालुक्यात देखील यावेळेस विधानसभा निवडणुक गाजणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदखेडा विधानसभा क्षेत्रात नवनवीन घडामोडी घडत आहेत.निष्ठावंतांचा मेळावा नंतर आता आमदार जयकुमार रावलांनी कार्यकर्ता मेळाव्याचे त्यांच्या गढीवर आयोजन केले आहे.

आमदार जयकुमार रावलांच्या उपस्थितीत दि २६ रोजी दुपारी १ वाजता दोंडाईचा येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.नुकतेच आमदार जयकुमार रावलांचे निकटवर्तीय म्हटले जाणारे कामराज निकम यांनी आमदार जयकुमार रावलांची साथ सोडून राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर संदीप बेडसे यांच्या सोबतीला शिंदखेडा येथे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत निष्ठावंतांचा मेळाव्याचे आयोजन केले होते.

निष्ठावंतांच्या मेळाव्यात कामराज निकम आणि संदीप बेडसे यांच्यासह ललित वारुडे यांनी आमदार जयकुमार रावलांवर अनेक आरोप केले होते.कामराज निकम यांनी आमदार जयकुमार रावलांची साथ सोडल्यानंतर व शरद पवार गटाच्या निष्ठावंतांच्या मेळाव्यानंतर आमदार जयकुमार रावल यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नव्हती.कामराज निकम यांनी साथ सोडल्यानंतर आमदार जयकुमार रावल काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र आमदार जयकुमार रावला ची कुठलीही प्रतिक्रिया समोर येत नव्हती.झालेल्या आरोपांवर आमदार जयकुमार रावलांचे कार्यकर्ता मेळाव्यात काय प्रतीउत्तर असेल यासाठी कार्यकर्ता मेळाव्याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

WhatsApp
Follow by Email
error: