बातमी कट्टा : नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर तसेच तळोदा येथे ई-पीक पाहणी ॲप बाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲपमध्ये खातेदाराची नोंदणी कशी करावी, पिकांची माहिती फोटोसह कशी अपलोड करावी याबाबत माहिती देण्यात आली. प्रशिक्षण शिबिरास तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सेवक, तलाठी तसेच शेतकरी उपस्थित होते.