बातमी कट्टा:- गावाला जात असल्याचे सांगून घरातून स्कुटी घेऊन बेपत्ता झालेला उच्चशिक्षित तरुणाचा आज दि 6 रोजी सायंकाळी तापी नदीपात्रात मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. बेपत्ता असल्याबाबतची शिरपूर शहर पोलीस स्टेशनात दि 4 रोजी नोंल करण्यात आली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील शामधाकड नगर(संभाजी नगर ) येथे राहणारा सागर विकास पाटील या 30 वर्षीय तरुणाचा आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गिधाडे तापी नदीपात्रात मृतदेह तरंगतांना आढळून आला.उच्चशिक्षित सागर पाटील हा पुणे येथे प्राचार्य म्हणून काम सांभाळत होता.लॉकडाऊन नंतर त्याचे घरुनच काम सुरु होते.दि 4 रोजी गावाला जात असल्याचे सांगून मयत सागर पाटील हा एम.एच 18 बीपी 4621 क्रमांकाच्या होन्डा स्कुटीने घरातून निघाला मात्र तो घरी परत आला नसल्याने त्याची शोधाशोध सुरु झाली.याबाबत त्याच्या नातेवाईकांनी बेपत्ता असल्याची पोलीस स्टेशनात नोंद केली होती.आज सकाळी एम.एच.18.बीपी 4621 क्रमांकाची स्कुटी गिधाडे तापी पुलाजवळ मिळुन आली.गिधाडे पुलानगजीक तापी नदीत सागर पाटील याचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढला मृतदेह बघून त्याच्या नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला. घटनास्थळी पोलीस स्टेशनचे मनोहर पिंपळे,पंकज पाटील दाखल झाले होते.यावेळी नातेवाईकांनी सागर पाटील याचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.मयत सागर पाटील याच्या पश्चात आई,वडील बहिण व एक लहान भाऊ असा परिवार होत.