उड्डाणपुलावर अपघात,आईचा मृत्यू बाप-लेक जखमी…

बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शहादा फाट्यावरील कळमसरे उड्डाणपुलावर एका अज्ञात स्कुल बसने उभ्या असलेल्या मोटारसायकल स्वारांना जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली सदर अपघातात मध्यप्रदेशातील एका महिलेचा जागीच मृत्य तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे.

सियाणीबाई खुदाश्या बारेला वय 50 रा.किरसाली ता सेंधवा मध्यप्रदेश असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे तर मुलगा व पती किरकोळ जखमी झाले आहेत सदर मयत महिला कुटुंबासह शिंदखेडा तालुक्यातील परसामळ येथे गेल्या पंधरा वर्षांपासून शेतमजूर म्हणून कामाला होती.रविवारी 17 जुलै रोजी मोटारसायकलने मध्यप्रदेशातील किरसाली येथे शेताच्या कामानिमित्त मुलगा जतन सिंग व पती खुदाश्या बारेला यांच्यासोबत जात होती.दरम्यान शहादा फाट्यावरील उड्डाणपुलावर सकाळी साडे दहा वाजेच्या मोटारसायकल उभी करून तिघेजण उभे असतांना अज्ञात स्कुल बसने जोरदार धडक दिली यात मुलगा जतनसिंग व खुदाश्या बारेला हे किरकोळ जखमी झाले तर सियानीबाई खुदाश्या बारेला ही महिला जागीच मयत झाली.मयत महिलेस शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी साठी दाखल केले असता डॉ नानसिंग पावरा यांनी तपासणी करून मयत घोषित केले.याप्रकरणी नितेश गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली.

WhatsApp
Follow by Email
error: