उद्यमशील बहुउद्देशीय संस्थे तर्फे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

बातमी कट्टा:- शहादा तालुक्यातील बामखेडा त त येथे उद्यमशील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत परिसरातील विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.

परिसरातील गावातील शाळा, विद्यालय व महाविद्यालयानी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.स्पर्धेच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नागसेन नगर मधील जेष्ठ नागरिक श्री जगण कापूरे ह्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव सुशील गव्हाणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी किती हलाखीच्या परिस्थिती तून शिक्षण घेत लाखो अस्पृश्याना गुलामगिरीच्यां बंधनातून मुक्त केले ह्याबद्दल आपले मत व्यक्त केले.स्पर्धेत एकूण 90 विद्यार्थ्यांना सहभागी झाले.

स्पर्धा सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घेण्यात आली. स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. लहान गटात इयत्ता 5 वी ते 8वी, मोठ्या गटात 9 वी ते 12 वी स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेला वडाळी, काकरदां, तोरखेडा,फेस,कुकावल, कोठली कोंढावळ, जयनगर ,हिंगणी, आदी गावातील विद्यार्थिनी सहभाग नोदवला.स्पर्धेचा निकाल 14 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शैक्षणिक साहित्य व बक्षीसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र गवळे ह्यांनी दिली.कार्यक्रमाला जगन कापूरे,सुमनबाई कढरे,रामराव गवळे,संतोष कापूरे ,राहुल सैंदांने, भटू कुवर,प्रवीण कढरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम च्या यशस्वी ते साठी यश सोनवणे,सचिन बोरसे,रविंद्र पावरा,संदीप सोनवणे,योगेश भोई,उमेश गवळे,ह्यांनी विशेष सहकार्य केले.

WhatsApp
Follow by Email
error: