बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी दि १८ रोजी मतदान झाले.उद्या दि २० रोजी या ग्रामपंचायत निवडणूकीचे मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत.यासाठी शिरपूर तहसिल कार्यालय येथे मतमोजणी कार्यक्रमासाठी नियोजन करण्यात आले आहे.
शिरपूर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी दि १८ रोजी ७३.६९ टक्के मतदान झाले आहे.यात १८,६८२ स्त्री तर २०३७८ पुरुष असे एकुण ३९,०६० मतदारांनी मतदान केले आहे.याबाबत दि २० रोजी शिरपूर तहसील कार्यालय येथे दोन फेरींमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. दोन फेरींमध्ये ९ टेबलांवर या १६ ग्रामपंचायतीचे नाव व प्रभाग मतमोजणी होणार आहे.सकाळी १० वाजताच मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार आबा महाजन यांनी दिली आहे.