उद्योगपती मुलाने आमदार वडिलांकडे केला होता पाठपुरावा, अखेर पुलासाठी ४ कोटींचा निधी मंजूर…

बातमी कट्टा: उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांच्या पाठपुराव्यामुळे शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली गावाजवळील लेंडी नाल्यावर पुलासाठी 4 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे.

शिरपूर टेक्सटाईल पार्क चेअरमन, उद्योगपती, युवा नेतृत्व तथा श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ मुंबई चे उपाध्यक्ष, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे संचालक चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली गावाजवळील लेंडी नाल्यावर पूल तयार करण्यासाठी आमदार अमरिशभाई पटेल यांच्याकडे पाठपुरावा केल्याने 4 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात 9 मार्च 2023 रोजी मंजूर झाला आहे.

उद्योगपती चिंतनभाई पटेल यांनी 9 सप्टेंबर 2022 रोजी अंतुर्ली गावाजवळ पुलाच्या समस्येबद्दल ग्रामस्थांशी चर्चा करून लवकरात लवकर पूल बनविण्याचे आश्वासन दिले होते.

या आश्वासनाची पूर्ती होत असल्याबद्दल अंतुर्ली व परिसरातील ग्रामस्थांनी चिंतनभाई पटेल यांच्यासह आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे आभार मानले आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: