उद्योजक राजकुमाराची राजकारणात दिमाखात एन्ट्री !!

बातमी कट्टा:- भारतीय जनता पार्टीने नुकतीच शिरपूर तालुक्यातील तालुका आणि शहर अध्यक्ष पदांची घोषणा केली.यात तालुकाध्यक्ष पदी किशोर माळी तर शहर अध्यक्ष पदी चिंतन पटेल यांची घोषणा करण्यात आली आहे. राजकारणी घराणे असतांना राजकारणापासून अलिप्त राहून उद्योगक्षेत्रात नाव लौकीक करत असतांना चिंतन पटेल यांंनी भाजप पक्षाच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारत खऱ्या अर्थाने राजकारणात आता एन्ट्री केली आहे.भाजपाचे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी चिंतन पटेल कशा पद्धतीने सांभाळतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र चिंतन पटेलांनी एकंदरीत राजकारणाचा स्विकार करुन शहराध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर याचा पक्षाला आणि शहरातील विकासात भर  पडणार असे बोलले जात आहे.

शिरपूर शहरातील भाजपाच्या शहर अध्यक्षपदाची धुरा हेमंत पाटील यांच्याकडे होती.सत्तेत असतांना पण आणी सत्तेत नसतांना देखील हेमंत पाटील यांनी शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी चोख पणे सांभाळली.म्हणजे सरकार नसतांना निवेदने आंदोलनाद्वारे शहरातील व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम हेमंत पाटील यांनी केले होते.तर भाजप सरकारमध्ये आल्यानंतर शहरातील विकासाच्या अनेक मुद्द्ययांमध्ये हेमंत पाटील यांनी भाजप शहराध्यक्ष असल्याची जबाबदारी पार पाडली होती.

यानंतर भाजप पक्षाने आता पुन्हा पक्षात फेरबदल करत चिंतन पटेल यांना शिरपूर शहर अध्यक्ष पदाची धुरा दिली.चिंतन पटेल यांचा मुळात स्वभाव हा नम्र आणि शांत संयमी असा अनुभवास येतो.उद्योग क्षेत्रात सर्वत्र चिंतन पटेलांनी वेगळा ठस्सा उमटवला आहे.राजकारणा पासून दुर राहत फक्त उद्योग व्यवसायावर भर देण्याचे काम चिंतन पटेल यांनी केले.मात्र उद्योग क्षेत्रात जरी मग्न असले तरी राजकीय वारसा असल्याने चिंतन पटेलांनी राजकारण जवळून बघितल्याने त्यांना तेवढाच अनुभव असल्याचे म्हणाव लागेल. चिंतन पटेल यांना शहराध्यक्ष पदाची धुरा दिल्या नंतर शहरातील अनेक तरुणांसाठी आणखी नवनवीन रोजगाराची व्यासपीठ चिंतन पटेल उभे करुन देऊ शकतात.यामुळे तरुणांना रोजगारा साठी कुठेही फिरण्याची गरज पडणार नाही.उद्योग क्षेत्रात असतांना चिंतन पटेल यांची वैयक्तिक अनेक दिग्गज मंडळींशी जवळचे संबध असल्याने त्याचा देखील उपयोग शिरपूर शहरातील विकास कामांसाठी होऊ शकतो आणि शहरातील समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी चिंतन पटेल प्रयत्नशील असतील कारण चिंतन पटेल यांनी आजतागायत समाजकारण केल्याचे बघायला मिळाले आहे. आता जरी भाजपाने शहराध्यक्ष पद दिले असले तरी चिंतन पटेल राजकारणापेक्षा समाज कार्यावर भर देतील असे एकंदरीत दिसून येत आहे.तरुण नेतृत्व म्हणून चिंतन पटेलांकडे बघितले जात असले तरी राजकारणातील पुढील वाटचाल कशी असेल याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

WhatsApp
Follow by Email
error: