उद्योजक हरीश गोयंका यांच्या आर.पी.जी ग्रुपच्या सोशल फाऊंडेशनच्या वतीने धुळे येथे ताप चिकित्सालय कक्ष स्थापित करण्यात आले आहे.

बातमी कट्टा:- उद्योजक हरीश गोयंका यांच्या आर.पी.जी ग्रुपच्या सोशल फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्यात 100 सर्व सुविधा युक्त ताप चिकित्सालय कक्ष देण्यात आले आहेत. दि 26 रोजी धुळ्याच्या सार्वजनिक विभागाला देखील देण्यात आलेल्या ताप चिकित्सालय कक्षाचे पत्रकार प्रशांत परदेशी आणि जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे.

आरोग्य व्यवस्थेला मदत लाभावी यासाठी उद्योजक हरीश गोयंका यांच्या आर.पी.जी ग्रुपच्या सोशल फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्रात शंभर सर्व सुविधा युक्त ताप चिकित्सालय कक्ष देण्यात आलेत.सध्या कोरोणा महामारी संकटाची पहिली व दुसरी लाट संपल्यानंतर तिसऱ्या लाटेच्या धोका संभवत आहेत. उद्योग क्षेत्राने यासाठी मदत करण्याच्या शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत खाजगी टायर , पायाभूत तथा कौशल्य क्षेत्रात नावाजलेली हरीश गोयंका यांच्या आर पी जी ग्रुपच्या सोशल फाउंडेशनच्या वतीने राज्यात 100 सर्व सुविधा युक्त ताप चिकित्सालय कक्ष हे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहे.

यापैकी एक ताप चिकित्सालय धुळे जिल्हा रुग्णालय येथे स्थापित करण्यात आले असून कक्षाचे 26 ऑक्टोबर रोजी वैद्यकीय अधिकारी जिल्हा रूग्णालयात धुळे डॉक्टर संजय शिंदे व पत्रकार प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी भगवान धन्वंतरी यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी डॉक्टर महेश भडागे जिल्हा शैल्य चिकिस्तक धुळे, डॉक्टर अश्विनी भामरे वैद्यकीय अधिकारी स्त्री रूग्णालय धुळे, श्रीमती प्रतिभा घोडके व सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्रजी काकडे, आर .पी .जी फाउंडेशन फीवर क्लीनिक ऑपरेटर कौस्तुभ नागरे व धुळे जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: