बातमी कट्टा:- रस्त्यावर भीक मागूनही पोटच्या सात गोळ्यांचे पोट भरु शकत नसल्याने आपल्या अडीच वर्षाच्या मुलालाच विकण्याची वेळ एका बेघर व निराधार महिलेवर आल्याची दुर्दैवी घटना घडली. मात्र अमळनेर पोलीसांच्या सतर्कतेने हा प्रकार रोखण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार अमळनेर शहरातील गांधीपुरा भागातील सुभाष चौकात एक महिला काही मुलांना विक्री करत असल्याची माहिती अमळनेर पोलीस निरीक्षक यांना मिळाली होती.मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस नाजिमा पिंजारी,दिपक माळी,रविंद्र पाटील आदींना सदर महिलेचा शोध घेण्यासाठी रावाना केले.त्या महिलेचा शोध घेऊन तिच्या सोबत असलेले तीन मुली व चार मुले आदींना पोलीस स्टेशनात आणले.सदर महिलेला विचारपूस केली असता हिराबाई देवा गायकवाड वय 40 बेघर फिरस्ते व सोबत ,3 मुली व 4 मुले असे तिचे अपत्य असून तिचे पती कोरोना काळात कोवीड आजाराने मयत झाले असल्याने तिचेकडे तिचे व स्वताचे मुलांचे उपजिविकेसाठी पुरेसे साधन नसल्याने ती तिचे मुलांना इच्छुक लोकांना देत होती.परंतु असे करणे हे बेकायदेशीर असले बाबत तिस सांगून भविष्यात ति तिचे मुलांना विकुन टाकण्याची शक्यता असल्याने तिचे ताब्यातील 3 मुली व 4 मुले व त्या महिलेच्या पालन पोषण करीता सदर बालकांणी काळजी घेणे साठी व त्या बालकांना संरक्षण मिळणे करीता त्यांना बाल कल्याण समिती जळगाव येथे हजर करुन महिला बाल सुधारगृहात पाठविले आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,नरसिंह वाघ,नाजिमा पिंजारी, दिपक माळीरविंद्र पाटील आदींनी केली आहे.