उप्परपिंड नदीपात्रातून वाळु उपसा करणाऱ्या दोन गटात फ्रि स्टाईल हाणामारी…3 जण रुग्णालयात दाखल…

बातमी कट्टा:- तालुक्यातील उप्परपिंड गावालगत असलेल्या तापी नदी पात्रातून वाळू उपसा करण्यावरून गावातील वाळू उपसा करणाऱ्या दोन गटामध्ये मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली असून शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ८ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेत ३ जण जखमी असून त्यांच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


शिरपूर तालुक्यातील उप्परपिंड शिवारात वाळू उपसावरून वाळु वाहतूक करणाऱ्या दोन गटांमध्ये अनेक दिवसांपासून किरकोळ वाद सुरू होता मात्र शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उप्परपिंड गावाच्या शिवारात दोन गट एकमेकांसमोर आल्याने दोन्ही गटातील तरुणांमध्ये बेदम मारहाण झाली त्यात शिरपूर येथील कुणाल नंदकुमार सोनवणे,गुड्डू पटेल – गिरासे,वसीम अब्दुल गिरासे रा. शिरपूर हे तिघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर संशयित परेश राजपूत,अमृत पाटील,नाना राजपूत उर्फ खल्या तसेच त्यांच्या सोबत असलेले ५ ते ६ इसम सर्व राहणार उप्परपिंड यांनी हातात काठ्या,पावडीच्या दांडक्याने मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आले असून संशयित आरोपी विरोधात भादंवि कलम ३२४ व इतर कलमान्वये रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला.

WhatsApp
Follow by Email
error: