बातमी कट्टा:- विद्युत प्रवाहाच्या शॉर्टसर्किट होऊन शेतातील 81 आर क्षेत्रातील 120 टन अंदाजे तीन लाख किंमतीचा ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील शेतकरी सतीश गंगाराम कुवर सह तीन यांच्या सामायिक शेतात एक आर 81 हेक्टर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती.त्या उसाच्या शेतातून विद्युत प्रवाहाच्या तारा गेल्या आहेत.या तारांमुळे दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते तीन वाजे दरम्यान शॉर्टसर्किट होऊन उसाच्या क्षेत्राला आग लागली. या शेतावरील उभ्या ऊस पिकाचे 0.81 हे.आर ऊस पिकाचे जळून पूर्णता नुकसान झाले यात अंदाजे 120 टन ऊस जळून नुकसान झाले आहे प्रति टन दोन हजार पाचशे रुपये प्रमाणे तीन लाख रुपये पर्यंतचे नुकसान झाल्याचा पंचनामा मंडळाधिकारी जुबेर पठाण, तलाठी एस एन डीगराळे, कोतवाल भुपेंद्र गिरासे यांनी पंचनामा केला. दोन महिन्यानंतर ऊस तोडणीला आला असता हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी यांनी त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.