ऊसतोडणी सुरु असतांनाच आढळली बिबट्याची पिल्ले

बातमी कट्टा:- ऊसतोडणीचे काम सुरु असतांना मजुरांना बिबट्याचे दोन पिल्ले आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.अचानक बिबट्याची पिल्ले आढळून आल्याने मजूरांसह परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.यावेळी ऊसतोडणी तात्पुरती थांबवण्यात आली.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार साक्री तालुक्यातील मालपुर शिवारात पांधन रस्त्यालगतच्या परिसरामध्ये कासारे
परिसरात शेतकरी शिवाजी भामरे यांच्या शेतातील ऊसाचे क्षेत्रात बुधवारी सकाळी 11 वाजता ऊसतोड मजूर ऊसतोडणीचे काम करत असताना दोन बिबट्याचे पिल्लू आढळून आले.याबाबत मजूरांनी शेत मालकाला माहिती दिली.शेतकरी शिवाजी भामरे यांनी या घटनेची माहिती वन विभागात दिली.घटनेची माहिती गावात पसरताच गावातील बघणाऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.मात्र मजूरांसह शेतकरी यामुळे भयभीत झाले आहेत.

पिंपळनेर वनक्षेत्रपाल अधिकारी ये.आर.महके यांनी दिलेल्या माहितीनुसार या शेतातील ऊसतोडणी तात्पुरती थांबवण्यात आली आहे.दोन्ही बिबट्याच्या बछड्यांना वन विभागद्वारे संरक्षण देण्यात आले आहे.येथे मादी बिबट व पिल्लांवर नजर ठेवण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: