ऊसाच्या शेतात बिबट्या !

बातमी कट्टा:- शेतात ऊस तोड कामगार एकत्र झाडाखाली जेवन करत असतांना अचानक ऊसाच्या शेतातून बिबट्या निघतांना मजूरांना दिसला.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली असून वनविभागाला सुचित करण्यात आले आहे.शेतकऱ्यांसह मजूरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.वनविभाग घटनास्थळी दाखल होत चौकशी सुरु आहे.

शिरपूर तालुक्यातील गिधाडे येथील विकास धनराज पाटील यांचे गिधाडे शिवारात ऊसाचे क्षेत्र आहे त्या ठिकाणी आज ऊस तोडणीचे काम सुरु होते.ऊस तोडणी करणारे मजूर जेवानासाठी शेतातील झाडाखाली एकत्र आले ते जेवन करत असतांनाच अचानक मजूरांना ऊसामधून बिबट्या निघत असल्याचे दिसून आले.मजूरांनी धावपळ केली असता बिबट्या पुन्हा ऊसाच्या क्षेत्राला पळाल्याचे मजूरांचे म्हणने आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली असून वनविभागाला याबाबत सुचित करण्यात आले आहे.उशिरापर्यंत वनविभागाकडून घटनास्थळी चौकशी सुरु होत.

WhatsApp
Follow by Email
error: