एकाच कारला दोन वेगवेगळे नंबर प्लेट,सा.पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकाने 11 लाखांचा मुद्देमाल केला जप्त….

बातमी कट्टा:- अवैधपणे देशी – विदेशी कंपनीची दारु वाहतूक करतांना पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकाने शिताफीने कारवाई करत दारुसह 11 लाख 36 हजार 875 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि 20 रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांसह पथकाने रात्रीच्या सुमारास कुडाशी -वार्सा गावाच्या दरम्यान हॉटेल कार्तिकी समोर ह्युन्डाई कंपनीची क्रेटा कारच्या पुढील बाजुस जी.जे.05,आर.एच.1068 ची नंबर प्लेट व मागच्या बाजूस एम.एच.02 ई.यु.3341 क्रमांकाची नंबर प्लेट असे दोन्ही बाजूला वेगवेगळ्या नंबर असलेल्या कार पोलिसांना दिसून आली.पोलीस येत असल्याची चाहूल लागताच संशयित कार सोडून फरार झाले.पोलिसांनी कारची तपासणी केली असता 1 लाख 66 हजार 875 रुपये किंमतीचा इम्पलेरियल ब्लु,ब्लेन्डर स्प्राईड,रॉयल चँलेंज,रॉयल स्पेशल,व्हिस्की बॉटल्स व कासबर्ग ,किंगफिशर बिअरचे डब्बे मिळून आले.पोलीसांनी दारु व 10 लाख किंमतीची पांढऱ्या रंगाची क्रेटा कार ताब्यात घेतली आहे.सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, विशाल मोहने,मकरंद पाटील, विजय पाटील, भुषण वाघ,रविंद्र सुर्यवंशी,पंकज वाघ,आदींनी कारवाई केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: