बातमी कट्टा:- नुकाताच नेत्यांनी केलेला शाहीथाट कार्यक्रमासाठी लाखो रुपयांचा खर्च त्यावर सर्वत्र सुरु असलेली चर्चा व याच शिरपूर तालुक्यात एकीकडे कोरोना नंतर वाढणारी बेरोजगारी व सतत सुरु असलेल्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात होणारे आर्थिक नुकसान या दोन्ही दृश्यांमुळे तालुक्यातील नेते मंडळींना तालुक्यातील आम जनता व शेतकऱ्यांची किती काळजी आहे हे सिध्द होते.येथे शिरपूर तालुक्याचे जरी कौतुक ऐकायला मिळत असणार तरी शिरपूर तालुक्यातून आतून किती पोखरला गेलाय याचा विचार करणे गरजेचे आहे.बंद साखर कारखाना व बंद दुध संघावर चिकार शब्द न काढणारे तालुक्याच्या विकास मॉडेल वर वाहवाही करणे म्हणजे जखमे वर मिठ टाकण्यासारखे आहे.
हायकंमाड येथून आलेले नेते मंडळी भाषण दरम्यान मोठमोठी गोष्टी व गुणगान बोलून गेलेत ते बोलणे सोप्या गोष्टी आहेत मात्र शिरपूर तालुका आतून कसा पोखरला जातोय याचा कोणीही सुगावा घ्यायला तयार नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या कापूस पिकाला भाव नाही त्यात पुर्णता उत्पन्न घटले आहे. निसर्ग साथ देत नाही त्यांना आपण काहीच करु शकत नाही. मात्र नेते मंडळींनी तरी या गंभीर गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे.गेल्या दोन वर्षात कोरोनानंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली अनेकांच्या नोकरींना रामराम म्हणाव लागलं, तालुक्याची संपूर्ण बिकट अवस्था होत असतांना तालुक्यातील नेते मंडळींनी एका कार्यक्रमासाठी केलेला लाखोंचा खर्च व त्यासाठी “शाहीथाट” कार्यक्रम बघता नेते मंडळींना तालुक्यातील जनतेची किती काळजी आहे हे यातून सिध्द होते.
सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांचे पूर्णता नुकसान झाले. कापूस पिकासाठी केलेला खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत आणि तालुक्यातील नेते मंडळींनी हे शाहीथाट साठी केलेला खर्च म्हणजे आमजनता व शेतकरी उपाशी आणि शेतकरी तुपाशी असच म्हणावे लागेल.