” एक आदर्श मॉडेल” इंटर ऍक्टिव्ह डिजिटल पॅनल बोर्ड व सीसीटीव्ही कॅमेरा असलेली शिरपूर तालुक्यातील पहिली जि.प. शाळा आहे.

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील वनावल जिल्हा परिषद गटात इंटर ऍक्टिव्ह डिजिटल पॅनल बोर्ड व सीसीटीव्ही कॅमेरा असलेली जि.प.शाळा रूदावली ही एकमेव तालुक्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा आहे.आज गुरुवार रोजी जिल्हा परिषद शाळा रुदावली येथे वनावल गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अभिलाषा भरत पाटील यांच्या हस्ते स्टार्स प्रकल्प अंतर्गत शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण मेळावा क्रमांक एक व व्हीएसटीएफ च्या माध्यमातून झालेल्या विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शाळेच्या व्हीएसटीएफ च्या माध्यमातून इंटरऍक्टिव्ह डिजिटल पॅनल बोर्ड चा अध्यापनात प्रत्यक्ष वापराचे प्रात्यक्षिक तंत्र स्नेही शिक्षक नामदेव अहिरे यांनी सादर केले.या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे,प्रिंटर, कॉम्प्युटर,तार कंपाऊंड ,नवीन स्वच्छतागृह ,पाण्याची टाकी ,वॉटर फिल्टर, परसबाग अशा अत्याधुनिक सुविधांची पाहणी करत उद्घाटन प्रसंगी जि.प.सदस्या अभिलाषा भरत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शाळा पूर्व तयारी मेळावा प्रशिक्षणासाठी जातोडे केंद्रातील सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका,लीडर माता यांना मार्गदर्शन करण्यात आले.व इंटर ऍक्टिव्ह डिजिटल पॅनल बोर्ड व सीसीटीव्ही कॅमेरे असलेली तसेच शंबर पटसंख्या असलेली जिल्हा परिषदेची तालुक्यातील पहिली शाळा आहे.ज्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार आहे.

सदर कार्यक्रम प्रसंगी भरत भिलाजी पाटील ( मा. पं. स. सदस्य, वनावल ) , पितांबर भगवान पाटील (उपसरपंच रुदावली), शालिग्राम शांताराम भील (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) ,प्रशांत लोटन मंगळे (पोलीस पाटील रुदावली) सदर मान्यवर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

यावेळी मनीषा वानखेडे (शिक्षण विस्तार अधिकारी बीट नंबर दोन शिरपूर) व अनिल बाविस्कर (केंद्रप्रमुख जातोडा ) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच शिक्षक  संदेश हजारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.सुलभक म्हणून दिपक कोळी व कल्पना पाटील यांनी मार्गदर्शन केले . याप्रसंगी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनील वाघ मुख्याध्यापक जि. प.शाळा रुदावली यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक धर्मेंद्र बापूराव पाटील व किशोर सुभाष महाले यांनी परिश्रम घेतले.

WhatsApp
Follow by Email
error: