बातमी कट्टा:- भरदिवसा गजबजलेल्या रस्त्यावर उभ्या मोटारसायकलीला लावलेली एक लाख 30 हजार रुपयांची बॅग संशयिताने लांबवल्याची घटना घडली घटना घटताच नागरीकांनी त्याचा पाठलाग केला मात्र संशयित पळून जाण्यास यशस्वी ठरला.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील भगवान पुंडलीक मराठे रा. बालाजी नगर शिरपूर हे निवृत्त शिक्षक असून घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी बुधवारी दि ६ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून एक लाख 30 हजार रुपयांची रक्कम काढली.त्यांनी सदर रक्कम बॅगेत ठेऊन आपल्या दुचाकी ने खंडेराव महाराज मंदिर परिसरात जय मातादी फर्निचर या दुकानासमोर नव्या घरासाठी लाकडी देवघर घेण्यासाठी मोटरसायकल उभी केली त्यांच्याजवळ असलेली पैशाची बॅग त्यांनी दुचाकीला टांगली होती. मोटरसायकल वरील बॅग तशीच ठेऊन ते दुकानात जात असतांनाच या
दरम्यान एक संशयित तरुण पैसे असलेली बॅग घेऊन पलायन केले.भगवान मराठे यांच्यासह दुकानदार आणि नागरिकांनी संशयितांताचा पाठलाग केला मात्र चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला.घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल होत पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे कारवाई सुरू होती..