बातमी कट्टा:- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर 2021 या महापरिनिर्वाणदिनी त्यांना आदरांजली वाहताना हारफूले – मेणबत्ती – अगरबत्ती न आणता “एक वही आणि एक पेन” आला असे आव्हान रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आले होते त्या आव्हानाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून या ठिकाणी हजारो वह्या जमा झाले आहेत.
या अनोख्या अशा उपक्रमाला धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी देखील या अभियानाला भेट देऊन फुल हार न आणण्याचे तसेच या अभियानाला वही-पेन आणून उत्तम प्रतिसाद द्या असे देखील आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी यावेळी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या एक वही एक पेन अभियानाला धुळे शहरातील आंबेडकरी समाजाने तसेच फाईट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नाना भाई साळवे, रिपाइंचे ज्येष्ठ नेते वाल्मीक दामोदर, शशिकांत वाघ, संजय भामरे यांनी देखील या अभियानाचे कौतुक करून आपले अनमोल सहकार्य केले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष धुळे जिल्हा अध्यक्ष विशाल पगारे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरण इशी शहर अध्यक्ष नागिंद मोरे उपजिल्हा अध्यक्ष भैया खरात, विनोद केदार, सुगत मोरे, अजय पगारे, राहुल पवार, पिंटू पवार, दीपक जाधव, विक्की धिवरे आदींनी महेनेत घेतली.