एटीएम मशीन फोडून 36 लाखांची चोरी करणाऱ्या त्या टोळीला हरियाणा राज्यातून घेतले ताब्यात…

बातमी कट्टा:- बँकेचे एटीएम मशीन फोडून तब्बल 36 लाखांची रक्कम चोरट्यांनी लांबविल्याची धक्कादायक घटना दि 14 रोजी दुपारी उघडकीस आली होती.याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या धुळे पथकाने या गुन्ह्याचा सखोल तपासाला सुरुवात केली होती.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाला यश प्राप्त झाले असून हरीयाणा राज्यातील चार संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 8 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिंदखेडा शहरातील शिरपूर रोड लगत स्टेट बँक जवळील बँकेचे एटीएम मशीन येथे दिनांक 14 रोजी अज्ञात संशयितांनी एटीएम मशीन फोडून 36 लाख 86 हजार 500 रुपये चोरी केल्याची घटना घडली होती.अज्ञात संशयितांनी बँकेचे तीन सी.सी टी.व्ही कॅमेरा पैकी एकावर स्प्रे मारला होता.तर इतर दोन कॅमेरांचे वायर तोडून बंद करण्यात आले.तर अलार्मच्या वायरी देखील तोडल्याचे दिसून आले होते.या एटीएम मशीनचे लोखंडी बॉल्ड तोडून,आतील कॅशीट डॉवर मधील 36 लाख 86 हजाराच्या 500 दराच्या 7 हजार 373 चलनी नोटा चोरी झाल्याची घटना घडली होती.

शिंदखेडा पोलिसांनी तात्काळ पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांना या घटनेची माहिती दिली असता त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या मदतीने चोरट्यांचा पुढील तपास सुरू करण्यात आला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाला सुरुवात केली असता चोरट्यांनी रेनकोट अंगावर परिधान करीत, तसेच एटीएम जवळील सीसीटीव्ही कॅमेरावर काळ्या रंगाच्या स्प्रे चा देखील प्रयोग केला आल्याचे निदर्शनास आले होते.यासंदर्भात तपास सुरू असताना पथकाने हरियाणा येथून चार संशयितांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जवळपास आठ लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: