ऑईल मिलला भिषण आग,लाखोंचे नुकसान

बातमी कट्टा;- दोंडाईचा शहरापासून 2 किमी अंतरावर (बाम्हणे ता. शिंदखेडा) शिवारातील केशरानंद जिनिंग मधील ऑइल मिलला दि. 23 सकाळी 9 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली या भिषण आगीत अंदाजे 70 ते 75 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा व शिंदखेडा अग्निशमन दलाचे वाहने दाखल झाले होते. आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रत्यन करीत होते.

बाम्हणे दोंडाईचा रस्त्यावर केशरानंद जिनिंग मधील ऑईल मिलला भीषण आग लागल्याची घटना सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान सदर आगीचे माहिती दोंडाईचा, शिंदखेडा वरवाडे नगर परिषदेला कळविले असता लागलीच अग्नीमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या व अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत केले.

तोपर्यंत आगीत वीस गाडी सरकी जळून खाक झाली होती. व ऑईल मिलचे चौदा मशीन पैकी बरेचशे मशिनी जळून खाक झाली आहे. उशीरा पर्यंत आग सुरू होती. घटनेची माहिती मिळताच केशरानंद उद्योग समुहाचे संचालक ज्ञानेश्वर आबा भामरे, केशरानंद जिनिंग चे संचालक शिवराज भामरे घटनास्थळी दाखल झाले होते. उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते दरम्यान या आगीत अंदाजे 70 ते 75 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुढील कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.

WhatsApp
Follow by Email
error: