कत्तीलीसाठी गुरांची वाहतूक करणाऱ्या पिकअपचा अपघात,दोन गायी ठार

बातमी कट्टा:- कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरांची तस्करी करणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली.यात दोन गायी जागीच ठार झाल्या तर चार गाई जिवंत मिळून आल्याने पिकपसह दोन लाख एकोणावीस हजाराचा मुद्देमाल पिंपळनेर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.सुकापुर ते होण्याचा पाडा या रस्त्यावर घटना घडली असून चालक व मालक दोघेही घटनास्थळावरून प्रसार झालेत.

या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एम एच झिरो फोर डी एस 9391 क्रमांकाच्या पिकअप वाहनात सहा गोवंश निर्दयतेने कोंबून यांची पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत असतांना सुकापुर ते होळयाचा पाडा या रस्त्याने जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकप रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रिक डीपी जवळ एका शेतात पलटी झाली या अपघातात दोन गाई जागीच ठार झाल्या तर चार गाई वाचल्या असून त्यांना पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळे मृत संविच्छेदन केले तर चार गाईंची गौशाळेत रवानगी केली असून एक लाख 50 हजार रुपये किमतीचे पिकप वाहन व जिवंत पोलिसांना मिळून आला आहे.पिकअप चालक व मालक घटनास्थळावरुन पसार झाले आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: