
बातमी कट्टा:- कत्तलीच्या उद्देशाने अवैधपणे गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त होताच सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पथकाने रस्त्यावर सापळा रचून पिकअप वाहनाला थांबवत गौवंश गुरांची सुटका करत दोन संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे दि 9 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सा.पोलीस निरीक्षक. सचिन साळुंखे यांच्यासह सी.एस.सोनवणे,रविंद्र सुर्यवंशी,भुषण वाघ यासह पोलीस पथक पिंपळनेर -सटाणा रस्त्यावरील शेलबारी घाटात सरकार हॉटेलच्या पुढे गतिरोधक असलेल्या ठिकाणी सापळा रचून थांबले.यावेळी त्यांना एम एच 04 डी.एस 9391 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाची पिकअप संशयितरीत्या येतांना दिसून आली.पोलीस पथकाने पिक अप वाहन थांबवून चौकशी केली असता पिक अप वाहनाच्या मागच्या बाजूस गाई,गोरे व बैल आढळले.
पोलीसांनी वाहनातील गोवंश गुरांसह 2 ला 71 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर शोएब अहमद शकील अहमद वय 27 मालेगाव व अब्दुल अहमद खान रा.मालेगांव या दोघांविरुध्द पिंपळनेर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.