बातमी कट्टा:- जेष्ठ शोध पत्रकार,कायदे तज्ञ आणि लेखक जगतराव सोनवणे यांचे आज धुळ्यात निधन झाले.त्यांची अंतयात्रा धुळे येथील राहत्या घरून सकाळी ९ वाजता शुक्रवारी निघणार आहे.

धुळे जिल्हा परिषदेचा कथित भ्रष्टाचार उघडकीस आणणारे जेष्ठ शोध पत्रकार जगतराव सोनवणे यांचे आज निधन झाले.सोनवणे यांनी काढलेल्या त्या भ्रष्टचाराच्या प्रकारनामुळे त्यावेळी महाराष्ट्रातले राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.त्यांना शोध पत्रकारितेसाठी अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले होते.कायदेविषयक पुस्तक लिखाणात राज्यात त्यांचा लौकिक होता.त्यांची अंतयात्रा धुळे येथील राहत्या घरुन शुक्रवारी सकाळी 9 वाजता निघणार आहे.