बातमी कट्टा:- घरातील कपाट लॉकर दुरुस्तीच्या नावाने आलेल्या दोन अज्ञातांनी कपाटातून 69 हजार 600 रुपय किंमतीचे सोने चांदीच्या दागिने लंपास केल्याची घटना शिरपूर शहरातील रामसिंग नगर येथे सोमवारी दुपारी घडली असून शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी शकीला बी राजू खाटीक रा.रामसिंग नगर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीत म्हटल्यानुसाय सोमवारी दुपारी रामसिंग नगर येथे शकीला बी राजू खाटीक हे घरात असतांना गल्लीत 25 ते 30 वर्षीय शीख धर्माचा पेहराव केलेले दोन अज्ञात इसम कपाटीचे लॉकर दुरुस्तीसाठी फिरत होते. त्यांना घरातील कपाटीचे बाहेरील लॉक दुरुस्तीचे सांगितले असता त्यानी कपाटाची पाहणी करून दुरुस्ती करीत असताना अज्ञातांनी बोलचाल करत अर्धातास काम करीत दुरुस्त झाल्याचे सांगून निघून गेले. त्यांनतर कपाटात पाहिले असता कपाट मध्ये बिघाड केलेला दिसून आल्याने कपाटाचे लॉकर तोडून पाहणी केले असता लॉकर मध्ये ठेवलेले 49 हजार 500 रुपये किमतीचे 20 ग्राम सोन्याचे व 20 हजार 100 रुपये किमतीचे 67 भार वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 69 हजार 600 रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरून नेल्याचे आढळून आले.घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आल्याने शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट देत पाहणी केली.याप्रकरणी शकीला बी राजू खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात कपाट दुरुस्तीच्या नावाने लबाडीच्या उद्देशाने कपाटात ठेवलेले दागिने चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ ललित पाटील करीत आहेत.