बातमी कट्टा:- घरफोडी करणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त दोन बालकांकडून पोलीसांनी एक लाख 47 हजार 600 रूपये किंमतीचे सोने,मोबाईल व रोकड जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणात शिरपूर पोलीस स्टेशनात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
शिरपूर शहरातील किरण सोसायटी जवळील काझीनगर येथील सिक्स बंगलो येथे वॉशरुमच्या खिडकीच्या काचा काढून त्याद्वारे मध्ये प्रवेश करून बेडरूम लोखंडी कपाटातून सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, घड्याळ, मोबाईल आदी घरफोडी झाल्याची घटना दि 17 रोजी घडली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हा बाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे स.पोलीस निरीक्षक गणेश फड तसेच शोध पथकाचे ललित पाटील,लादुराम चौधरी,गोवींद कोळी,विनोद अखडमल, प्रविण गोसावी, मुकेश पावरा,मनोज दाभाडे, प्रशांत पवार, व होमगार्ड नाना अहिरे आदींनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत त्यांच्याकडे विचारपूस केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली दोघांकडून एक लाख 47 हजार 600 रूपये किंमतीचे सोने, मोबाईल व रोकड जप्त करण्यात आला आहे.