करोना महालसीकरण अभियान दि. २ ऑक्टोबर “लक्ष्य ५०,०००” डोस

मा. राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दि २ ऑक्टोबर २०२१ रोजी संपूर्ण धुळे जिल्ह्यात करोना लसीकरण महाअभियान जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. या अभियानात आपण जिल्ह्यात ५०,००० लस एका दिवसात देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने सर्व शासकीय/ अशासकीय कार्यालय, व्यापारी प्रतिष्ठाणे, संस्था व सर्व मा.धुळेकर नागरिक यांचे सहकार्य अपेक्षित आहे.

संपूर्ण महाराष्ट्र राज्य करोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभे आहे त्याअनुषंगाने जास्तीत जास्त जनतेने त्वरित लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. धुळे जिल्ह्यात आजपर्यंत ४७.५६% लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण झालेले आहे त्यानुसार अजूनही करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धुळेकराना गंभीर धोका आहे.

त्यामुळे दि २ ऑक्टोबर रोजी १८ वर्षावरील सर्व जबाबदार नागरिकांनी स्वतःहुन आपल्या जवळच्या आरोग्यकेंद्रात करोना कोविशील्ड अथवा कोव्हॅक्सिन लसीचा पहिला अथवा दुसरा डोस जाऊन घ्यावा व जबाबदार धुळेकर नागरिक म्हणून स्वतः च्या कुटूंबास व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन मा पालकमंत्री, मा जिल्हाधिकारी, मा मुख्य कार्यकारी अधिकारी, मा पोलीस अधीक्षक, मा मनपा आयुक्त, मा.जिल्हाशल्यचिकित्सक, मा.जिल्हा आरोग्यधिकारी, मा.मनपा आरोग्यधिकारी यांच्यावतीने देखील करण्यात आले आहे.यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती विनंती करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: