बातमी कट्टा:- 56 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दि 1 रोजी दुपारी घडली आहे.कर्जाच्या विंविचनेतून आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.आत्महत्या बाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील मानसिंग गुलाबसिंग राजपूत वय 56 यांचा दुपारी 4 ते 5 वाजेदरम्यान राहत्या घरी गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मयत मानसिंग राजपूत यांचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.
मयत मानसिंग राजपूत हे काही दिवसांपासून चिंतेत होते.मानसिंग राजपूत यांच्या पत्नी ललिताबाई राजपूत यांचे कोरोना काळात निधन झाले होते.मयत मानसिंग राजपूत यांच्याकडे 60 गुंठे शेती होती.शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह होता.मात्र निसर्ग साथ देत नसल्याने शेतीत त्यांना उत्पन्न मिळत नव्हते.यामुळे मानसिंग राजपूत यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता.कर्जाच्या चिंतेतूनच मानसिंग राजपूत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.मयत मानसिंग यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार होत.