काँग्रेसचे शामभाऊ “नाराज”,दिला राजीनामा, उमेदवारी बदलली नाही तर थेट इशारा…

बातमी कट्टा:- धुळे लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून डॉ शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केल्याननतर काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून शामकांत सनेर हे देखील इच्छुक होते.

बघा व्हिडीओ https://youtu.be/20PTwXSE_JA?si=SC79aUvUuFhGv8-s

धुळे लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाने तिसऱ्यांला डॉ सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केली.यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अब्दुल रहेमान यांना धुळे लोकसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत नव्हती.धुळे लोकसभेत काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत असतांना काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री डॉ शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/20PTwXSE_JA?si=SC79aUvUuFhGv8-s

डॉ शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शामकांत सनेर यांनी आज आपला अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानी राजीनामा पत्रात म्हटले की काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती पण मतदारसंघ बाहेरील उमेदवारांना उमेदवारी देऊन पक्षाने मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर(इच्छुक उमेदवारांवर ) अन्याय केला आहे.यामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.मात्र या राजीनामा काँग्रेस पक्षाकडून काय निर्णय घेण्यात येतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बघा व्हिडीओ https://youtu.be/20PTwXSE_JA?si=SC79aUvUuFhGv8-s

WhatsApp
Follow by Email
error: