खान्देशात श्रावण महिना सुरु होताच प्रसिध्द ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. कामानिमित्त बाहेर गेलेले सर्व घरातील सदस्य मंडळी या उत्सवासाठी एकत्र येत असतात.या दिवसाची खान्देशकरांना प्रतिक्षा असते.
याच कानबाई माता उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर खान्देशकरांसाठी शिरपूर तालुक्यातील जातोडे येथील साईराज बँण्डतर्फे कानबाई मातेच्या उत्सवासाठी (मनी कानबाई नी जत्रा भरनी ये) आयराणी बोलीभाषेत नवीन गाणे प्रदर्शित केले जात आहे.उद्या “साईराज बँण्ड” या युट्यूब चैनलवर सदर गाण प्रदर्शित केले जाणार आहे.
या गाण्याचे निर्माता व गीतकार शरद धनगर हे असून दिपक मोरे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.तर चंद्रकांत बडगुजर यांनी या गाण्याला रेकॉर्डिंग केले आहे.व्हिडीओ एडीटींग अक्षय कोळी व भटु कोळी यांनी केली आहे.आणि मायकल डांस टिमने याच नृत्य साधर केले आहे. यासाठी महेंद्र गुरव व हितेश गुरव यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.
शरद धनगर साईराज बँण्ड जातोडे 9403464781