कानुबाई मातेचा यात्रोत्सवाला सुरुवात…

बातमी कट्टा:- दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग आजारामुळे रद्द झालेली माळमाथा भागातील बळसाणे येथील कुलदैवत कानुबाई मातेच्या यात्रोत्सवाला अक्षयतृतीया च्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ रोजी प्रारंभ होणार आहे मातेला गावकऱ्यांमार्फत मानाचा नैवेद्य दाखवून दोन दिवसीय यात्रेस मोठ्या उत्साहात सुरुवात होते यात्रे दरम्यान खांदेशभरातून नवसपुर्तीसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते यापार्श्वभुमीवर यात्रोत्सव समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.


गावात शेकडो वर्षांपासून कानुबाई मातेचे प्राचीन मंदिर आहे मातेच्या यात्रोत्सव दरम्यान नवसपुर्तीकरिता येथे बळसाणे व परिसरासह खान्देशभरातील भाविक आपापली हजेरी लावत असतात यात्रेनिमित्त मंदिर परिसरात तरुणांमार्फत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कानुबाई मातेच्या दोन दिवसीय यात्रोत्सवाला बुधवार रोजी ग्रामस्थांकडून मानाचा नैवेद्य दाखवून प्रारंभ होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले कानुबाई मातेच्या यात्रोत्सवाला नौकरी व व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गावी गेलेले कुटुंब आखातीज चा सण व यात्रोत्सवाकरिता आपल्या गावाची ओढ लागलेली असते गावात गर्दी होत असल्याने चैतन्यपुर्ण वातावरण दिसून येत आहे.


बळसाणे ग्रामपंचायतीमार्फत पाण्याची व वीजेची सोय करण्यात आली आहे यात्रोत्सव काळात वीजपुरवठा खंडित होता कामा नये याकामी लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे यांनी संबंधितांना सुचना दिल्या आहेत
येथील कानुबाई मातेची यात्रा खांदेशात प्रसिद्ध असल्याने दुरदुरवरून व्यवसायिक येथे दाखल होत आहेत येणाऱ्या व्यवसायिकांना जागा वाटप करण्यात आली असून स्टाॅल उभारण्याची काम पुर्णत्वाकडे आहे यात पुजेचे साधन सामुग्री साडी चोळी , बिल्लोर , नाडा , कुंकू , हाळद , नारळ विक्रेते , खाद्य पदार्थांचे स्टाॅल , मनोरंजनासाठी पाळणे , खेळण्याची दुकाने , कटलेरी , रसवंती , थंडपेय यासह संसारोपयोगी साहित्याची दुकाने व्यवसायिक दाटत आहेत
यात्रोत्सवाच्या दिवशी सायंकाळी विठ्ठल मंदिराच्या मुख्य चौकात हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत तगतरावाचा बोली लागेल बोली घेणाऱ्या भाग्यशाली ला तगतराव हाकण्याचा मान मिळेल तसेच त्याच ठिकाणाहून वाजतगाजत गुलालाची उधळण करीत मोठ्या जल्लोषात तगतरावाची मिरवणूक काढण्यात येणार आहे तगतरावाची मिरवणूकाची सांगता झाल्यावर लोकनाट्य तमाशा मंडळाची हजेरी होईल व रात्री ग्रामस्थांच्या करमणूकीसाठी यात्रा समिती ने शांताराम चव्हाण यांचा लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम आयोजित केला आहे. दरम्यान ५ मे रोजी यात्रोत्सव निमित्त सकाळी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे या कुस्ती आखाड्यात प्रसिद्ध मल्लांची मोठ्या संख्येने हजेरी लागत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

WhatsApp
Follow by Email
error: