कामगार प्रवास करत असलेल्या वाहनाचा अपघात,चालत्या वाहनाला ट्रकची धडक

बातमी कट्टा:- टेक्स्टाईल कंपनीत कामाला जाणाऱ्या कामगारांच्या टाटा मॅजीक वाहनाला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना आज दि 9 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे.वाहनात 8 ते 9 कामगार प्रवास करत होते.अपघातानंतर जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एक जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार चोपडा शहादा रस्त्यावरील मिलट्री स्कुल जवळ टाटा मॅजीक या चारचाकी वाहनाला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला.टेक्स्टाईल कंपनीत कामाला असलेले कामगार हे टाटा मॅजिक वाहनाने कामावर जात असतांना शिरपूर चोपडा रस्त्यावरील मिल्ट्री स्कुल जवळ गतीरोधक आल्याने टाटा मॅजिक चालकाने वाहन हळू केले. यादरम्यान चोपाड्याहून शिरपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने मागून जोरदार धडक दिली.या अपघातात राहुल भगवान वाघ वय 30,प्रकाश गुलाब चव्हाण वय 27 ,प्रकाश साहेबराव पाटील 39 चालक,सिध्दार्थ सुरेश बारे सावेर, अभिलाष सुधाकर महाले वय 30 भौरखेडा, जगदीश चव्हाण 26 सावेर,विनोद आबा वानखेडे सावेर मुन्ना वर्जन चव्हाण वय 23 सावेर हे जखमी झाले असून दिनेश वर्जन चव्हाण वय 25 हा वाहनाच्या मागच्या सिटवर
बसल्याने गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले यावेळी जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.दिनेश वर्जन चव्हाण गंभीर जखमी असल्याने तात्काळ धुळे रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी महामार्ग पोलीस शिरपूरचे प्राभारी अधिकारी नरेंद्र पवार यांच्यासह पथक दाखल झाले.त्यांनी घटनेची चौकशी करत घटनास्थळी वाहनांची तपासणी करण्यात आली होती. याबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: