बातमी कट्टा:- शिरपूरला जोडणारा खर्दे- उंटावद रस्त्याची अक्षरशः दैयनीय अवस्था झाली आहे.हा रस्ता मंजूर झाल्याचे काही महिन्यांपूर्वी सांगण्यात आले होते.मंजूर असणार तर मग या रस्त्याच्या कामाला अद्याप मुहूर्त का सापडला नाही ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित होत आहे.या रस्त्याचे काही राज-का-रण सुरू आहे का ? बाहेरच्या मान्यवरांना बोलवून शिरपूर तालुक्याच्या नावाने चांगल्या चांगल्या गोष्टी बोलून तोंड सुख करायचे आणि शिरपूर तालुक्यातील जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल कोण बोलणार ? सध्या शिरपूरात काही राजकीय मंडळींकडून फक्त तोंड करे बाता अन….. अशी गत सुरू आहे.
शिरपूर म्हणजे सुवर्ण नगरी,शिरपूर म्हणजे स्मार्ट सिटी अशा एका ना अनेक गोष्टींनी शिरपूर शहर व तालुक्याची वाहवाही करून जणू शिरपूर जगावेगळे असे शहर असल्याचे संपूर्ण महाराष्ट्रात छाप टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुढारींना शिरपूर तालुक्यातील जनतेला होणाऱ्या अडचणी दिसत नाहीत का ? शिरपूर शहराला जोडणारा सावळदे खर्दे उंटावद रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.या रस्त्यावर जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.रोजच लहान मोठे अपघातांच्या घटना येथे होत असतात. याबाबत आपल मत काय एकवेळा जनतेला कळू तर द्या ! काही महिन्यांपूर्वी या रस्त्याला मंजूरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे असे सांगण्यात आले होते.मग कामाला सुरुवात का होत नाही ? आणखी किती जीव जाण्याची वाट बघत आहात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते आज देखील अत्यंत बिकट अवस्थेत आहेत.रस्ता हा देशातील मानवाचा मुलभूत अधिकार आहे. मग शिरपूर तालुक्यात आज देखील मुलभूत अधिकारांसाठी लढा द्यावा लागतो त्यासाठी संघर्ष करावा लागतो तर मग कशाला उगीच बड्या बड्या बाता करते साहब ? उगीच तोंड करे बाता अन् …… अशी अवस्था तर सध्या शिरपूर तालुक्यात झाली आहे.शिरपूरला जोडणारा खर्दे उंटावद रस्ता मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते मग कामाला मुहूर्त का सापडत नाही ? की काही राज-का-रण सुरु आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.