काय सांगताय,केळीला मिळाला ४८०० किंमतीचा दर,काय सांगतोय तरुण शेतकरी बघा व्हिडीओ…

बघा व्हिडीओ

बातमी कट्टा:- युट्यूब आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती घेत कुंदन पाटील या तरुण शेतकऱ्यांने वेलची केळीची लागवड केली होती.त्या केळीच्या पहिल्या तोडणीला ४८०० रूपयांचा भाव मिळाल्याने अडीच एकारामध्ये कुंदन पाटील यांनी लाखो रुपयांचा निवड नफा कमवला आहे.या वेलची केळीला तब्बल ४८०० रुपयांचा भाव मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कुंदन पाटील यांच्या वेलची केळीच्या बागेला भेट देत माहिती जाणून घेत आहेत.

On YouTube

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या हिंगोणी येथील कुंदन पाटील या तरूण शेतकऱ्याने वेलची केळीची वर्षभरापूर्वी अडीच एकारामध्ये तीन हजार झाडांची लागवड केली होती.वेलची केळी ही प्रामुख्याने आंध्रप्रदेश केरळ राज्यातील भागामध्ये लावली जाते. शेतकरी कुंदन पाटील यांनी यूट्यूब च्या माध्यमातून या केळी लागवडीचे तंत्र अवगत केले आणि गेल्या वर्षी या केळीची लागवड केली.वेळोवेळी मार्गदर्शन आणि युट्यूबच्या माध्यमातून कुंदन पाटील यांनी वेलची केळीला लागणारे खत फवारणी देत त्याची निगा राखली.कुंदन पाटील यांनी या वेलची केळीची पहिली तोडणी केली असून त्यांना ४८०० रूपये इतका दर मिळाल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

Video

कुंदन पाटील यांनी पारंपरिक शेती सोबतच टरबूज फळबाग लागवड केली होती.त्यांच्या तिन महिन्याच्या पिकातून त्यांना लाखो रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते.आता त्यांनी वर्षभरापूर्वी लागवड केलेल्या या वेलची केळीतून १५ लाखांपर्यंत निवळ नफा मिळणार असल्याचे कुंदन पाटील यांनी सांगितले आहे.या वेलची केळीचे एक झाड सुमारे २० फुट पेक्षा जास्त उंच असून ही केळी आकाराने लहान मात्र खायला गोड असते. त्यामुळे या केळीला मोठ्या शहरांमध्ये प्रचंड मागणी असते.अन्य तरुण शेतकऱ्यांनीही अशाच पद्धतीने शेतात वेगळा प्रयोग करून उत्पन्न वाढवावे असे कुंदन पाटील यांनी सांगितले.

व्हिडीओ
WhatsApp
Follow by Email
error: