बातमी कट्टा:- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात घडला असून या अपघातात तलाठी व वाहन चालक दोघांचा जागिच मृत्यू झाल्याचा तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर आर्वी शिवारातील रोकडोबा हनुमान मंदीराच्या जवळ नाशिकहून धुळ्याकडे येणारी भरधाव कारने दुभाजक तोडून धुळयाकडून आर्वी कडे येणाऱ्या कारला धडक दिली. यात आर्वी गावाकडे जाणाऱ्या कारमधील दोघांचा जागिच मृत्यू झाला तर एक जण गंभीर आहे.धुळे तालुक्यातील आर्वी येथील तलाठी हिरालाल नानाभाऊ माळी (रोकडे) ढाढरे ता.धुळे हे दि 3 रोजी सकाळी 7 ते 7:15 वाजेच्या सुमारास एम एच 18 एजे 2062 क्रमांकाच्या स्वताच्या स्विफ्ट डिझायर कारने धुळ्याकडून आर्वीकडे जात होते.
ही कार चालक धनराज उर्फ दीपक विठ्ठल मराठे रा. मोहाडी धुळे हे चालवत होते तर सुनील प्रल्हाद मोहन हे मागच्या शिटवर बसले होते.यावेळी तीघेही कारने आर्वीकडे जात असतांना नाशिकहुन धुळेच्या दिशेने भरधाव येणाऱ्या एम एच 16 आर – 5992 क्रमांकाच्या इनोव्हा कारने दुभाज तोडून स्विफ्ट कारला जाऊन धडकली.यात स्विफ्ट कार मधील तलाठी हिरालाल रोकडे व चालक धुनराज ऊर्फ दीपक मराठे यांचा जागिच मृत्यू झाला.तर मागच्या शिटवर बसलेले सुनील मोहर.हे गंभीर जखमी झाले.घटनास्थळावरुन भरधाव इनोव्हा कार चालक फरार झाला घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली.क्रेनच्या साह्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आले.
