बातमी कट्टा:- भरधाव कारने पेट्रोलपंपाच्या बाहेर निघणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.हा अपघात ईतका विचत्र होता की यात ट्रॅक्टर दोन तुकडे होऊन फेकले गेले.मात्र नशीब बलवत्तर होते म्हणून कोणतीही जिवतहानी झालेली नाही.यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच काहीसे म्हणावे लागेल.
काल दि 8 रोजी दुपारच्या सुमारास शहादा शहराच्या बाहेर असलेल्या प्रकाशा रस्त्यावरील मनीष पेट्रोल पंपाबाहेर सव्वा चार वाजेच्या सुमारास विचीत्र अपघात घडला.शहादा तालुक्यातील वर्डे टेंभे येथील गजेंद्र गिरासे हे आपल्या एम एच 04 सी जे 11 क्रमांकाच्या कारने शहादाकडून वर्डे टेंभे आपल्या गावी जात असतांना मनीष पेट्रोल पंपाबाहेर येणाऱ्या ट्रॅक्टरला जावून धडकले.
हा अपघात ईतका भयंकर होता की यात ट्रॅक्टरचे मध्यभागातून दोन तुकडे झाले.ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन रस्त्यावर फेकले गेले.रस्त्यावर संपूर्ण डिझेल पडले होते तर कारच्या पुढील भागाचा चुराडा झाला होता.सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.नशीब बलवत्तर म्हणूनच ईतका मोठा भयंकर अपघातात देखील किरकोळ जखम शिवाय कोणतेही जिवीतहानी झालेली नाही.त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असच म्हणावे लागेल.