
बातमी कट्टा:- मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील बिजासन घाटात काळ आला होता पण वेळ आली नव्हती असाच काहीसा प्रकार प्रवासींना अनुभवायला मिळाला. मध्यरात्रीच्या सुमारास घाटात अचानक ट्रॅव्हल्स उलटली. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राजस्थान राज्यातील भीलवाडा येथून पुण्याकडे जाणारी जांगिड विश्वकर्मा टुर्स & ट्रॅव्हल्स ही एम पी 44 झेड डी 6411 क्रमांकाची ट्रॅव्हल्स मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील बिजासन घाटाच्या खाली रस्त्याच्या बाजूला ट्रॅव्हल्स उलटली.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मृत्यूंजय दूत लकी जगदेव,सागर चारण,मुकेश चारण,प्रभू चारण यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.

ट्रॅव्हल्स मधील अंदाजे 30 पेक्षा जास्त प्रवासींना अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स मधून बाहेर काढले.सुदैवाने या अपघातात जिवीतहानी टळली.कमध्यरात्री अंधारात घटना घडल्याने घटनास्थळी रुग्णवाहिकेतून प्रवासींना एका हॉटेलवर सुखरूप पोहचवण्यात आले.काळ आला होती मात्र वेळ नव्हती याचा अनुभव ट्रॅव्हल्स मधील प्रवासींना अनुभवायला मिळाला प्रवासींपैकी कोणालाही दुखापत झालेली नाही.
