बातमी कट्टा:- किरकोळ कारणावरून शिरपूरात एकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.घटेनंतर फरार झालेल्या संशयिताला पोलीसांनी एका तासात ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर शहर पोलीस स्टेशनात ज्ञानेश्वर बळीराम रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले कि दि १० रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील ईदगाह नगर भागात सार्वजनिक शौचालय जवळ लघूशंका का करतो असे म्हटल्याचा राग आल्याने मनोज भगवान मराठे याने रामभाऊ भगवान माळी यांना हाताबुक्यांनी मारहाण करत पकडुन सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर जोराने डोक्यावर आपटल्याने रामभाऊ माळी यांचा डोळ्याच्या भुईजवळ जबर मार लागल्याने मृत्यू झाला.रामभाऊ माळी यांना उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी रामभाऊ माळी यांना मृत घोषित केले.याबाबत संशयित मनोज मराठे विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करत पोलीसांनी मनोज मराठेला ताब्यात घेतले आहे.