बातमी कट्टा:- पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी किराणा दुकान फोडून किरणा वस्तूंसह रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे.
धुळे तालुक्यातील बोरीस येथील रस्त्या लगत पुष्पराज देविदास बोरसे यांच्या मालकीचे मातोश्री किराणा अँण्ड जनरल स्टोअर्स दुकान आहे.दि 21 रोजी पहाटे 2 ते 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानातील 40 ते 50 हजार किंमतीचे किराणा वस्तूंसह 70 हजारांची रोकड चोरी झाल्याची माहिती दुकानाचे मालक पुष्पराज बोरसे यांनी दिली आहे.