बातमी कट्टा:- टेकडीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना आज दि 27 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली आहे.याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील सोनगीर येथील भोपाल ट्रान्समिशनच्या बाजूला उत्तरेस असलेल्या टेकडीला लागून मोकळ्या जागेत एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी सोनगीर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या पथक घटनास्थळी दाखल झाला.सदरचा मृतदेह कोणाचा ! सदर घटना घातपात की अन्य काही याबाबत पोलीसांकडून तपास करण्यात येत असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची कारवाई सुरु आहे. याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
