
बातमी कट्टा:- महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित स्वो. वि. सं. चे विकासरत्न सरकरसाहेब रावल कृषी महाविद्यालय, दोंडाईचा येथील कृषिदूतांचे नंदुरबार तालुक्यातील तिलाली गावात आगमन झाले आहे.
ग्रामीण जागरूकता व कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत अंतिम वर्षाचे विद्यार्थी योगेश धनगर, तेजस गांगुर्डे, शुभम पाटील, प्रसाद पिंगळे, पुष्कर सोनवणे, सुदर्शन सोनवणे, मयूर सूर्यवंशी व सुदर्शन वाघ हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कृषीदूत हे गावात राहणार असून, शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे प्रात्यक्षिकांसह आयोजन करणार आहेत. यात शेतजमिनीचे माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड, आधुनिक तंत्रज्ञान, पिकांवर येणारे किड-रोग संबंधित माहिती व त्यांचे निवारण, तण व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन करतील.
त्यांच्या समवेत सरपंच स्मिता पाटील,उपसरपंच छोटा भिल ग्रामसेवक टी. के. खरे ,कारकून गोकुळ ठाकरे यांच्यासह इतर ग्रामस्थांची भेट घेऊन या कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्दिष्ट व त्यासंबंधित ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आर. बी. राजपूत, उपप्राचार्य प्रा. आर.बी.पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा.एल. ए. गिरासे, कार्यक्रम अधिकारी प्रा.आय.पी. गिरासे व प्रा. एस. व्ही. सुरडकर यांचे मार्गदर्शन लाभले.