बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा गोडवा येणार अशी अपेक्षा आता तालुक्यातील काही मंडळींकडून करण्यात येत आहे. त्याचे कारण असे की बंद अवस्थेत असलेला शिरपूर सहकारी शेतकरी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे वृत्तपत्रांमधून जाहीर करण्यात आले आहे. आणि विशेष म्हणजे योगायोग म्हणाव लागेल की,यादरम्यानच नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समितींची निवडणूकी रणधुमाळी सुरु होणार आहे. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत प्रस्ताव पाठवून त्यावर विचार विनीमय करण्यासाठी सभासदांकरीता दि 10 रोजी विशेष सर्व साधरण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.कारखाना भाडेतत्त्वावर दिला तर तालुक्यातील जनतेला नक्की आनंद होईल मात्र अपेक्षा फक्त ऐवढीच की निवडणूकीच्या तोंडावर कारखान्याचे राज-का-रण नको व्हायला.
राज्यासह तालुक्यातील काही ग्रामपंचायती,शहरातील नगरपरिषद,कृषी उत्पन्न बाजार समिती आदींच्या निवडणूकी बाबत सर्वत्र चर्चा सुरु आहेत.काही निवडणूकींच्या नेमकी तारीख जरी जाहीर झाली नसली तरी निवडणूकीत लढण्यासाठी जोतो आपल्या परीने कामाला लागला आहे.10-12 दिवसांपूर्वी शिरपूर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्तवा पाठविला असून त्यावर सर्व सभासदांनी एकत्र येऊन विचारविनिमय करुन निर्णय घेण्यासाठी दि 10 रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.कारखाना सुरू करण्यासाठी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार या शिरपूर सहकारी साखर कारखान्यात 16 हजार पेक्षा जास्त सभासद मंडळी आहेत.आता कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यासाठी सर्व सधारण सभेत हजर रहावे यासाठी सभासद मंडळींपर्यंत प्रत्यक्ष निरोप पोहचविण्यात आला आहे का ? कारण तालुक्यातील ग्रामीण भागात जेथे वृत्तपत्र पोहचले नाही तेथे सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सभासदांना कशी पोहचेल ? या सभेत कोणी प्रशासनाचे प्रतिनिधी आणि बँकेचे प्रतिनीधी असणार आहेत का ? काही दिवसांपूर्वी मंत्रालयात कारखान्या बाबत झालेल्या बैठकीचा अजेंड्यावर उल्लेख केलाय का ? या कारखानासाठी प्रशासक आणि प्रशासकीय जबाबदारी नेमण्याची गरज आहे का ? आणि विशेष म्हणजे तालुक्यातील संपूर्ण जनतेला समजण्यासाठी या सभेचे व्हिडीओ व ऑडिओ चित्रीकरणसाठी वृत्तांकनासाठी येथे पत्रकारांना उपस्थिती दिली आहे का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना सुरु व्हावा अशी प्रत्येकाची तळमळ आहे. भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णयाबाबत याआधी देखील विचार केला असता तर कारखाना सुरु करण्यासाठी केव्हाच प्रयत्न सुरु झाले असते मात्र उशीरा का होईना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णयामुळे शेतकऱ्यांकडून आंदन व्यक्त होत आहे.मुळ प्रश्न ऐवढाच की यात कुठलेही राज-का-रण होऊ नये !