
बातमी कट्टा:- शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील कृषी महावद्यालयातील कृषी कन्यांकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी त्यांनी दाऊळ गावातील ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.”चला धरूया स्वच्छतेची वाट सर्वजण मिळून लावू या कचऱ्याची विल्हेवाट” जयघोषात यावेळी कृषी कन्या यांनी दाऊळ येथे स्वच्छता मोहीम राबवून समस्थ गावकऱ्यांची मने जिंकली.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राचार्य आर.बी.राजपूत,उपप्राचार्य राहुल पाटील,कार्यक्रम समन्वय प्रा. सूरज चांदूरकर,डॉ. कोमल भास्कर यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी ज्योत्स्ना चौधरी, मधुरा देशमुख, प्राची ढाकरे, श्रृतिका गाडगे, बोरसे अश्विनी, ईश्वरी मुळे, गावित अश्विनी, कोकणी दीपीका आदींसह उपस्थित गावकरी व विद्यार्थी दाऊळ येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.
