
बातमी कट्टा:- शिंदखेडा तालुक्यातील चौगावं बुद्रुक परिसरातील बदलती शेती, क्रांतिस्मृतीवनाची निर्मिती, परिसरात असलेल्या जैव वनस्पती यांचा अभ्यास विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषी महाविद्यालय दोंडाईचा येथील विद्यार्थीनी करणार आहेत. त्यांनी केलेल्या अभ्यासातून चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात झालेला आर्थिक बदल, बदलती पीक पद्धती, माती परीक्षण, सतत पाण्यामुळे जमिनीचा खालावलेला पोत याचा शोध विद्यार्थीनी अभ्यासाद्वारे घेणार आहेत.
महाविद्यालयातील मयुरी गवळे, गुंजन वैद्य, कावेरी शेवाळे, स्मिता बोरसे , अनुजा अहिरे, गुंजन पाटील या विध्यार्थीनी अभ्यास करणार आहेत.
त्यांच्या समवेत चौगाव सरपंच गिराबाई शालीक मोरे, उपसरपंच दयानंद दिनकर सोनवणे, ग्रामसेवीका – राजबाई पाटील यांच्यासह इतर ग्रामस्थांची भेट घेऊन या कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्दिष्ट व त्यासंबंधीत ग्रामस्थांची चर्चा केली. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.आर. बी. राजपूत सर,उपप्राचार्य: प्रा.आर.बी.पाटील सर, कार्यक्रम समन्वयक प्रा.एल. ए. गिरासे,कार्यक्रम अधिकारी प्रा. आय. पी. गिरासे, व प्रा. एस. व्ही. सुरडकर यांचे मार्गदर्शन लाभले
गुंजन वैद्य विद्यार्थिनी, विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषी महाविद्यालय, दोंडाईचा.
“कृषी महाविद्यालयात तीन वर्षांपासून आम्ही शेती विषयक बाबींचा अभ्यास करीत आहोत, परंतु, पुढील दोन महिन्यांत चौगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बदलत्या शेतीचा अभ्यास करणार आहोत.क्रांतिस्मृतीवनातील जैवविविधतेचा अभ्यास करणार आहोत”.