“कृषी सहाय्यक” अधिकारीचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला

बातमी कट्टा:- शेतातील घराजवळ कृषी साहाय्यक अधिकारींनी गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

शिरपूर तालुक्यातील जातोडे शिवारात जातोडे व बाळदे गावाच्या मध्ये अरुणावती नदी लगत असलेल्या शेतात आज सकाळी मजूर शेतात जात असतांना बाळदे येथील प्रभाकर तुळशीराम पाटील वय 45 यांचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी बाळदे गावाचे पोलीस पाटील विठ्ठल पाटील व जातोडे पोलीस पाटील दाखल झाले. याबाबत शिरपूर पोलीस स्टेशन यांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक अहिरे यांच्यासह पथक दाखल झाले होते.प्रभाकर तुळशीराम पाटील हे कृषी साहाय्यक म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

WhatsApp
Follow by Email
error: