
बातमी कट्टा:- धुळ्यात पोलिसांनी कॅफेवर छापा टाकत अश्लील चाळे करणाऱ्या ८ महाविद्यालयीन तरुण तरुणी मिळुन आले. याप्रकरणी कॅफे मालकविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
देवपुर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रित्या चालणा-या कॅफेवर कारवाई करणेबाबत पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अधीक्षक किशोर काळे सो,उपविभागीय धुळे शहर ऋषीकेश रेडडी यांनी सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार आज दिनांक १ रोजी १३.०० वाजेच्या सुमारास देवपुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांना गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, स्वामी नारायण रोडालगत आर टी ओ मिसळ च्या वर ड्रीम कॅफे नावाच्या कॅफेमध्ये महाविदयालयीन तरुण व तरुणी यांना अश्लील चाळे करण्यासाठी लहान लहान कम्पार्टमेंट तयार करुन देवुन, तसेच रुम उपलब्ध करुन देवुन तासाप्रमाणे पैसे आकारीत आहे. त्यानुसार सदर ठिकाणी देवपुर पोलीस स्टेशन येथील पोलीस पथकाने छापा कारवाई केली असता, तेथे ८ महाविदयालयीन तरुण व ८ महाविदयालयीन तरुणी असे अश्लील चाळे करतांना मिळुन आले. त्यांना व सदर कॅफेचा मालक राकेश रमेश कोळी रा नगाव बारी ता. जि. धुळे यास ताब्यात घेवुन कारवाई करण्यात आली.सदर कारवाईत कॅफे मालक याच्याविरुध्द भादंवि कलम २९० प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच महाविदयालयीन तरुण आणि तरुणी यांच्या पालकांना समक्ष बोलावुन समज देवुन सोडुन देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे सो, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,साहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील,सुनिल वसावे,साईनाथ तळेकर, राजेश इंदवे,मिलींद सोनवणे,पंकज चव्हाण,कैलास पाटील, राजेंद्र हिवरकर,सौरभ कुटे,राहुल गुंजाळ, मनिषा बागड, अशोक चव्हाण अशांनी कारवाई केली असुन पुढील तपास राजेंद्र हिवरकर हे करीत आहे.