बातमी कट्टा:- सुरत नागपूर महामार्ग क्र ६ वर केमिकलने भरलेली टाकी घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रालाचा तोल गेल्याने ट्राला पलटी झाल्याची घटना आज दि २५ रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.या अपघातात ट्रालासह केमिकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सुरत नागपूर महामार्गावर क्रमांक ६ वरील धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथे वापी येथून आलेल्या केमिकलने भरलेली टाकी घेऊन जाणाऱ्या जीजे.१५.यूयू.१६४९ क्रमांकाचा भरधाव ट्राला आज दि २५ रोजी पहाटेच्या सुमारास पलटी झाल्याची घटना घडली. घटनेनंतर आनंदखेड येथील ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेत वाहन चालक व क्लिनर यांना ट्रालाच्या बाहेर काढले.या घटनेत केमीकलसह ट्रालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबत धुळे तालुका पोलीस स्टेशनात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.