केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात…

व्हिडीओ

बातमी कट्टा:- भरधाव केमिकल टँकर अचानक पलटी झाल्याने केमिकलला गळती लागल्याची घटना आज दि १५ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली.सुदैवाने अग्निशमन बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्याने केमिकल गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

On youtube

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार बदोडा गुजरात येथून हैदराबादकडे जाणाऱ्या जिजे १६ एयु क्रमांकाची भरधाव केमीकल टँकर धुळे शहराजवळील जवळील गरताड बारी जवळ अचानक पलटी झाला.टँकर पलटी होताच केमिकल गळतीला सुरुवात झाली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी धुळे अग्निशमन बंबला संपर्क साधला धुळे महानगरपालिकेची अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल होत केमिकल गळतीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झालेली नाही.

WhatsApp
Follow by Email
error: