बातमी कट्टा:- केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या स्फोटात दोन कामगार चार ते पाच फुट उंच फेकले जाऊन दोघेही कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

दि 12 रोजी दुपारी नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा येथील आर.आर.इन्फॅक्ट टायर प्लांटच्या बॉयरमध्ये अचानक गॅस तयार होऊन स्फोट झाल्याची घटना घडली होती. यामुळे कंपनीत किरकोळ आग लागली होती मात्र कामगारांच्या मदतीने आग आटोक्यात आणली मात्र स्फोटात दोन कामगार तीन ते चार फुट उंच फेकले गेले होते.या स्फोटात राकेश शृंगार वय 23 व पंकज वाघेला वय 24 या दोनही कामगार गंभीर जखमी झाले आहेत.या दोघाही जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र पुढील उपचारासाठी गुजरात राज्यात घेऊन गेले आहेत.

दुपारी बेडकीपाडा परिसरातील स्थानिकांना जोराचा स्फोट झाल्याचा आवाज आला होता.यानंतर बेडकीपाडा येथील कंपनीत स्फोट झाल्याचे समजले होते.घटनास्थळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर,उपनिरीक्षक नासीर पठाण यांच्यासह महसूल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या कंपनीत जुने टायर जाळून त्यापासून केमिकल तयार केले जाते.यावेळी बॉयलर मध्ये अचानक गॅस तयार होऊन स्फोट झाला होता.येथे जुनाट टायर जाळून केमीकल तयार केले जात असल्याने यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते.काही वर्षांपूर्वी देखील अशा कंपनीत मोठा स्फोट होऊन येथील कामगार जखमी झाले होते.या कंपनींना। बंद करण्यात यावेत यासाठी नवापूर येथे अनेकवेळा निवेदन व मोर्चे काढण्यात आले आहेत.या धोकादायक कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.